महाशिवरात्रीच्या उपवासाचा डाएट प्लॅन

महाशिवरात्रीच्या उपवासाचा डाएट प्लॅन

उपवासाच्या टीप्स

उपवासाने मन शांत राहतेच पण शरीरही शुद्ध होते असे समजले जाते. पण उपवासाच्या दरम्यान कोणतेही साईड इफेक्ट्स होऊ नये म्हणूनच काही गोष्टी करणे गरजेचे आहे. या पाच टिप्स तुमचा उपवास हा शरीराच्या दृष्टीने यशस्वी घडवण्यासाठी नक्कीच मदत करतील…

१. तुम्ही उपवासादरम्यान फळे खाणार असाल तर प्रत्येक तीन तासांना एक फळ खाल ही काळजी घ्या. फळांमध्ये चिकू, पपई, पेरू अशा फळांना प्राधान्य द्या. त्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळतानाच पोटही भरलेल राहत.

२. जर तुम्ही उपवासासाठी फक्त ज्युसवर अवलंबून राहणार असाल तर त्यामध्ये गाजर, टॉमेटो, कलिंगड, मोसंबी, संत्री यासारख्या फळांचा वापर करा.

३. तुम्हाला ज्युस नको असल्यास प्रत्येक अडीच तासाच्या अंतराने हा पर्याय वापरा. एक ग्लास पाण्यामध्ये लिंबु आणि मधाचा वापर करून हे पाणी तुम्ही पिऊ शकता. जर मध नको असेल तर साखरेचा वापर करा.

४. कोणताही फळांचा किंवा ज्युसचा पर्याय नको असेल तर आपल्या शरीराला पाणी ऊर्जा देईल याची काळजी घ्या. प्रत्येक दीड तासात एकदा पाणी प्या. त्यामुळे शरीराला ताकद मिळतानाच अनेक विकारही दूर होतात.

५. उपवासात फराळ करणार असेल तर शाबुदाण्याला पर्यायी अशा गोष्टींमध्ये राजगिऱ्यात तयार केलेल पदार्थ तसेच बटाटा असलेल्या पदार्थांचे सेवन करा. तळलेल्या चिप्स, वेफर्स, चिवडा आणि शेंगदाणे यासारखे पदार्थ शक्यतो टाळा. तेलकट खाल्ल्याने तुमची अॅसिडिटी नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.

First Published on: February 21, 2020 7:58 AM
Exit mobile version