नगरमध्ये ८०० शाळा, कॉलेजच्या कॅन्टिनला एफडीएचे पत्र; जंक फूडला मनाई

नगरमध्ये ८०० शाळा, कॉलेजच्या कॅन्टिनला एफडीएचे पत्र; जंक फूडला मनाई

नगरमध्ये ८०० शाळा, कॉलेजच्या कॅन्टिनला एफडीएचे पत्र; जंक फूडला मनाई

शालेय विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह सारख्या आजारांचे प्रमाण वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन(एफडीए)विभागाने नगर जिल्ह्यातील सुमारे ८०० शाळांना पत्र पाठवून शाळा, कालेजच्या परिसरातील कँन्टिनमध्ये पिझ्झा, बर्गर सारख्या जंक फूडची विक्री तातडीने बंद करण्याचा आदेश दिला आहे. जंक फूड ऐवजी दूध, फळे, दुग्धजन्य पदार्थ आणि पोषक अन्नघटक असणारे पदार्थ उपलब्ध करावेत, असे देखील एफडीएने शाळांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पौष्टिक पदार्थ उपलब्ध करण्याच्या सूचना

अलिकडच्या काळात बहुतेक शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील कँन्टिनमध्ये प्रामुख्याने पिझ्झा, बर्गर सारख्या जंक फूड मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. जंक फूड मधील मैदा, साखर आणि मीठ यांचे असणारे अतिरिक्त प्रमाण विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानीकारक असल्याचे दिसून आले आहे. जंक फूडच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान वयातच लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार या सारखे आजार होण्याची शक्यता जास्त असते. या दृष्टीने एफडीएने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यास देखील सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एफडीएच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना लेखी पत्र पाठवून परिसरातील कँन्टिनमध्ये पिझ्झा, बर्गर सारख्या जंक फूडची विक्री बंद करण्याच्या तसेच या पदार्थांऐवजी पौष्टिक पदार्थ उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांच्या कँन्टिनमधून पिझ्झा बर्गर हद्दपार करण्यासाठी एफडीए ने काही मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याचेही नियोजन केले जात आहे.


हेही वाचा – मुंबईकरांनो जंक फूडमुळे यकृतात वाढते चरबीचे प्रमाण

First Published on: July 21, 2019 3:55 PM
Exit mobile version