Coronavirus: करोनासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये फिवर ओपीडी

Coronavirus: करोनासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये फिवर ओपीडी

केईएम हॉस्पिटल

सध्या करोनाचा संसर्ग पाहता सर्दी, तापाचा जोर दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ओपाडी सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि जेजे या सरकारी हॉस्पिटलमध्ये २४ तास ओपीडी सुरू राहणार आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांचा विचार करता राज्य सरकारच्या जे. जे. हॉस्पिटल समूहाने ज्येष्ठ नागरिकांसाठी जिरीयाट्रिक ओपीडी सुरू केली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवत कनिंदे यांनी सांगितले. तसेच, फिवर ओपीडीही सुरू करण्यात आली आहे.

करोनाचा धोका सर्वाधिक ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आहे. त्यामुळे, ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, छोट्या-मोठ्या आजारांसाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊनच उपचार घ्यावेत. यासाठी जे.जे. हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र व्यवस्था केलेल्या जिरीयाट्रिक ओपीडीमध्ये उपचार घेण्यासाठी यावे, जेणेकरुन प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.


हेही वाचा – Coronavirus: उद्यापासून सर्वसामान्यांना लोकल प्रवास बंद


डॉक्टरांनी ज्येष्ठ नागरिकांना लिहून दिलेली औषधे त्याच ठिकाणी मिळतील अशी व्यवस्था केलेली आहे. तसेच, करोना विषाणूमुळे होणाऱ्या रोगाच्या लक्षणांमधील जास्त ताप हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. त्यासाठी ही जे. जे हॉस्पिटलमधील ओपीडी विभागामध्ये स्वतंत्र फिवर ओपीडीची सुरुवात करण्यात आली आहे. संबंधीत रुग्णांसाठी ओषधांची व्यवस्थाही त्याच ठिकाणी करण्यात आली आहे.

जेजेतील करोना रुग्ण संबंधीत व्हिडीओ खोटा

कोव्हिड १९ संबंधित अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. करोनाचा रुग्ण जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. पण, हा रुग्ण जळगाव येथील असून पोटाचा विकार असलेला आहे. त्याला कोणतीही करोनाची लागण नाही किंवा तो करोनाचा संशयितही नाही. त्यामुळे, त्याला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्याच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. पण, जेजे हॉस्पिटलसंबंधित कोणतीही व्हिडीओ व्हायरल झाल्यास वैद्यकीय अधीक्षकांकडे चौकशी करावी अशी सुचना हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

सध्या करोना संसर्गाची भीती सर्वांनाच आहे. शंकेने सर्व जण सर्दी खोकला असला तरीही हॉस्पिटलकडे धाव घेत आहेत. त्याचा विचार करता केईएम हॉस्पिटलमध्ये चोवीस तास सर्दी तापाची विशेष ओपीडी सुरु करण्यात आली आहे.

– डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम हॉस्पिटल.

 

First Published on: March 21, 2020 11:09 PM
Exit mobile version