पीएमपीएमएल चालक आणि दुचाकीस्वाराची हाणामारी; पुण्यातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

पीएमपीएमएल चालक आणि दुचाकीस्वाराची हाणामारी; पुण्यातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

पुण्यामधील पीएमपीएमएल बस चालक आणि नागरिक यांच्यातील वाद सातत्याने वाढत आहेत. दररोज नागरिक पीएमपीएमएल विषयी तक्रार करत असतात. अशातच रविवारी पीएमपीएमएल बस चालक आणि दुचाकीचालक याच्यात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. ओव्हरटेक केल्याने हाणामारी झाल्याचे समजते. या प्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे. (fight in pmpml driver and two wheeler man in pune viral video)

पुण्यात रविवारी स्वारगेट डेपोची बस क्रमांक-७९९ डीआर २५५० ही सुसाट वेगाने पुणे स्टेशन परिसरात आली. त्यावेळी दुचाकीवरून तरुण जात असून, ते बससमोर आडवे आले. थोडक्यात अपघात टळल्याने चालक आणि दुचाकीस्वार या दोघांमध्ये बाचाबाची झाली. पुणे स्टेशन स्थानक परिसरात घडली. बाचाबाची सुरू असताना दुचारी स्वाराने थेट चालकाची कॉलर पकडून चपलांनी हाणामारी सुरू केली.

या घटनेमुळे पुणे स्टेशनच्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – खुनाचा गुन्हा चालला असता, पण विनयभंगाचा मान्य नाही, जितेंद्र आव्हाड भावूक

First Published on: November 14, 2022 5:19 PM
Exit mobile version