अनधिकृत होर्डिंगविरोधात गुन्हा दाखल करणारे धारणकर निलंबित

अनधिकृत होर्डिंगविरोधात गुन्हा दाखल करणारे धारणकर निलंबित

अनधिकृत होर्डिंग गुन्हा दाखल करणारे धारणकार निलंबित

रमजान ईदच्या सणात अनधिकृत होर्डिंग लावल्याप्रकरणी भाजपचे जेष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांच्यासह चार नागरसेवकांविरोधात महापालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला होता. ही बाब कुलकर्णी यांच्यासह चंद्रकांत खोडे, रुपाली निकुळे, शाहीन मिर्झा यांनी आज सुरू असलेल्या महासभेत निदर्शनास आणून दिली. याप्रकरणी सभागृहात तीव्र प्रतिक्रिया उमटली. गुन्हा दाखल होण्यापूर्वी आपली परवानगी घेतली नसल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्पष्ट केल्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. याचवेळी रुपाली निकुळे यांनी सभागृहात ठिय्या मांडण्याचा प्रयत्न करत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी संबंधित पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर निर्णय देताना महापौर रंजना भानसी यांनी धारणकरांना तातडीने निलंबित करून सभागृहाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

 


हेही वाचा – होर्डिंग्जमुळे गुदमरतेय मुंबई

हेही वाचा – नाशिकमधील २९ क्लासेस विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित


First Published on: June 25, 2019 12:56 PM
Exit mobile version