तृतीयपंथी मारहाण प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

तृतीयपंथी मारहाण प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

तृतीयपंथीयाला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण ( फोटो सौजन्य - हिंदुस्तान टाईम्स )

ठाण्यातील तृतीयपंथी मारहाण प्रकरणात मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देहविक्री करत असल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी माजिवाडा पुलाजवळ तृतीयपंथीयाला मारहाण केली होती. रविवारच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर कापुरबावडी पोलिसांनी मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

का मारले तृतीयपंथीयाला?

माजिवाडा पुलाजवळ देहविक्री करत असल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी तृतीयपंथीयाला बेदम मारहाण केली. शिवाय तृतीयपंथी ट्रक ड्रायव्हर आणि लोकांना लुटत असल्याचा आरोप देखील मनसेने केला. मारहाणीची खबर पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत तृतीयपंथीयाची सुटका करण्यात आली. त्यानंतर तृतीयपंथीयाला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. पोलिस सध्या व्हिडिओच्या आधारे मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचा शोध घेत आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

First Published on: May 29, 2018 6:11 AM
Exit mobile version