कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल

कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल

Maharashtra politics : Sanjay Raut rightly said..., Mohit Kamboj's target on Thackeray

कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते. मोहित यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसिज बॅंकेकडून कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाचा त्यांनी योग्य वापर केला नाही. त्यामुळे मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कंबोज यांनी हा आरोप फेटाळला आहे.

नेमके प्रकरण काय?

2011 ते 2015 या कालावधीत मोहित कंबोज यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसीज बँकेकडून (Indian Overseas Bank) 52 कोटी रुपयांचे कर्ज (Loan) घेतले होते. पण कंबोज यांनी कर्ज ज्या कारणासाठी घेतले होते, त्यासाठी त्याचा न वापर करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

बॅंक इश्यूज काढून माझ्यावर गुन्हा दाखल

“मला कळाले मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी 2017 मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यूज काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असं वाटतं की, महाविकास आघाडी सरकार असे करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसे होणार नाही. हे नवाब मलिकांचे काम असेल किंवा संजय राऊतांचे काम असेल तर मी याच्याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही”, असे कंबोज यांनी म्हटले.


हेही वाचा – यूपीच्या नेत्याला महाराष्ट्रातून राज्यसभेचे तिकीट दिल्यानं आशिष देशमुखांचा राजीनामा

First Published on: June 1, 2022 8:30 AM
Exit mobile version