टिळक रस्त्यावरील इमारतीला भीषण आग

टिळक रस्त्यावरील  इमारतीला भीषण आग

इमारतीला भीषण आग

पुणे: टिळक रस्त्यावरील एका इमारतीतील तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅटला सकाळी नऊच्या सुमारास मोठी आग लागली. फ्लॅटमधील स्टोरेजरुममध्ये शॉटसर्किटमुळे आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यानंतर इतरत्र ही आग पसरली. ज्या फ्लॅटला आग लागली होती त्याच्या खालच्या मजल्यावर बँकांची कार्यालये आहेत. अग्निशमन दलाकडून तातडीने आग अटोक्यात आल्याने मोठा धोका टळला. या आगीत फ्लॅट पूर्ण जळून खाक झाला आहे.

या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आगीने भीषण रुप धारण केल्याने तब्बल सव्वातास सलग पाण्याचा मारा करुन आग अटोक्यात आणल्याचे फायर ब्रिगेडकडून सांगण्यात आले. दरम्यान, या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल सकाळी 9.13 च्या सुमारास टिळक रोडवरील अपार्टमेंटला आग लागल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन फायरगाड्या आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पाण्याचा मारा करुन काही वेळात ही आग आटोक्यात आणण्यात आली. यानंतर सध्या कुलिंग करण्यात येत आहे. या आगीत तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

First Published on: October 11, 2018 12:59 AM
Exit mobile version