Coronavirus: नवी मुंबईतही कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू

Coronavirus: नवी मुंबईतही कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू

महाराष्ट्र पोलीस

राज्यभरात कोरोनाने हाहाकार उडवला असून कोविड योद्ध्यांनाही आपल्या जाळ्यात ओढलेले आहे. राज्यात आतापर्यंत हजारो पोलिसांनी कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यात आता नवी मुंबईतही एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सागरी सुरक्षा शाखेत कार्यरत असणाऱ्या पोलिसाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवी मुंबईतील पोलिसाचा हा पहिलाच मृत्यू आहे. त्यामुळे नवी मुंबईतील पोलीस वर्तृळात हळहळ व्यक्त करण्यात आली. मृत ४५ वर्षीय पोलीस हवालदार रबाळे येथील पोलीस कॉलनीत राहायला होते. त्यांच्यासहीत त्यांच्या आई आणि पत्नीला देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना वाशीमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

२४ तासांत राज्यात कोरोनामुळे ३ पोलिसांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनामुळे तीन पोलिसांचा मृत्यू झाला तर जुलै महिन्यांत आतापर्यंत १९ पोलिसांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलातील पोलिसांची संख्या आता ७९ झाली आहे. राज्यात सध्या १ हजार २०४ पोलिसांवर उपचार सुरु आहे तर अवैध वाहतुकीप्रकरणी आतापर्यंत पावणेतेरा कोटी रुपयांचा दंड पोलिसांनी वसतुल केला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत कोरोनाबाधित १ हजार २०४ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यात १३९ पोलीस अधिकारी आहे तर इतर १ हजार ०६५ पोलीस कर्मचार्‍याचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोनामुळे राज्यात ७९ पोलिसांचा मृत्यू झाला असून मुंबईत सर्वाधिक ४७ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

First Published on: July 13, 2020 9:10 PM
Exit mobile version