LocKdown – घराबाहेर पडाल तर गाढवावरून धिंड काढण्यात येईल!

LocKdown – घराबाहेर पडाल तर गाढवावरून धिंड काढण्यात येईल!

देशापाठोपाठ मुंबईतील सोसायट्यांनीही स्वत:ला केले 'लॉकडाऊन'

देशात लॉकडाऊन असतानाही अनकेजण रस्त्यावर उगाचच भटकताना दिसतात. सरकार, पोलिस वेळोवेळो आवाहन करून देखील लोक कोणाचही ऐकायला तयार नाहीये. मात्र अशा लोकांसाठी बीड जिल्ह्यातील एका गावात अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. जर कुणी व्यक्ती तीनपेक्षा अधिक वेळा घरातून बाहेर पडला तर पाचशे रुपये दंड आकरण्यात येणार आहे. घरातून चौथ्यांदा बाहेर पडल्यावर गाढवावरून धींड काढण्यात येणार आहे.

बीडमधील केज तालूक्यात टाकळी गावात अनेकजण विनाकारण घराबाहेर पडताना दिसतात. गावातील काही ग्रामस्थ कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याने, गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी मिळून जर कुणी व्यक्ती तीन पेक्षा अधिक वेळा घराबाहेर पडल्यास पाचशे रुपये दंड आकरण्यात येईल, असा ठराव घेतला. तसेच तो व्यक्ती चौथ्यांदा घराबाहेर दिसल्यास त्याची गाढवावरुन धिंड काढण्यात येणार आहे.

सरपंचांनी काढला फतवा

गावामध्ये दवंडी देऊन सर्व ग्रामस्थांपर्यंत हा प्रस्ताव पोहचवण्यात आला आहे. विनाकारण गप्पा मारत बसू नये यासाठी गावातील पाराला डांबराने रंगवून ठेवलं आहे. त्याचबरोबर गाढवावरून धींड काढायची नसल्यास घरातून बाहेर पडू नका असा सल्ला दिला आहे.

First Published on: April 1, 2020 9:30 AM
Exit mobile version