लंडनच्या बाजारात पाच टन केशर आंबा रवाना

लंडनच्या बाजारात पाच टन केशर आंबा रवाना

केसर आंबा

दिल्ली-नाशिक विमानसेवेला उत्तम प्रतिसाद

जेट एअरवेजतर्फे सुरू झालेल्या दिल्ली-नाशिक व नाशिक-दिल्ली विमान सेवेला सलग दुसऱ्या फेरीतही उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मार्गावर अखंड सेवेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोमवारी नाशिकहून दिल्लीसाठी ११९ तर दिल्लीहून नाशिकसाठी १३० प्रवाशांनी प्रवास केला. त्याशिवाय कार्गोलाही चांगला प्रतिसाद मिळाला. जेटद्वारे लंडनच्या बाजारपेठेत सुमारे पाच टन केशर आंबा रवाना झाला. त्यासाठी हिच विमानसेवा उपयोगी पडली. यामुळे नाशिकच्या फळ बागायतदार आणि शेतकऱ्यांना ही विमानसेवा अत्यंत उपयोगाची होणार आहे.

केसरी आंबा लंडनला रवाना

नाशिकमधून थेट राजधानी दिल्लीपर्यंत हवाईसेवा सुरू करण्याची नाशिककरांची मागणी शुक्रवारी प्रत्यक्षात आली. उडान-२ योजनेंतर्गत नाशिकला तिसरी पसंती देण्यात आली आहे. आतापर्यंत ओझर विमानतळावरून पाच वेळा मुंबई, पुणे व नागपूरसाठी सेवा सुरू झाली; परंतु प्रवाशांचा अभाव व संरक्षण विभागाकडून निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी यांमुळे एकही सेवा निरंतर सुरू राहिली नाही. परिणामी नाशिकमधून निरंतर विमानसेवा सुरू होण्याची आशा मावळली होती.

लँडिंग आणि टेक ऑफ इन टाइम
जेट कंपनीच्या दिल्ली- नाशिक विमानसेवेला अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. सेवेच्या पहिल्याच दिवशी दिल्लीहून १२८ तर नाशिकहून १२० प्रवाशांनी प्रवास केला. आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार अशी तीन दिवस सेवेची हमी कंपनीकडून देण्यात आली. विशेष म्हणजे, विमानाचे लँडिंग व टेक ऑफ वेळेत झाले.

First Published on: June 21, 2018 8:21 AM
Exit mobile version