इमारतीच्या प्रॉपर्टी कार्डवर फ्लॅटधारकाचे नाव लागणार!

इमारतीच्या प्रॉपर्टी कार्डवर फ्लॅटधारकाचे नाव लागणार!

आतापर्यंत इमारतीमधील फ्लॅटधारकांना आपल्या नावावर घर असल्याचे समाधान असायचे, पण तो ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीच्या प्रॉपर्टी कार्डवर त्याचे नाव नसायचे. मात्र यापुढे तसे होणार नाही. फ्लॅटबरोबर इमारतीचा मालक असल्याचा पुरावा त्याला मिळणार आहे. राज्यभरातील सुमारे एक लाखांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या इमारतींमधील सुमारे ३ कोटी फ्लॅटधारकांना याचा फायदा मिळणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी सदनिकांच्या मालकी अधिकाराची नोंद अभिलेखात घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम २०१९ नव्याने तयार करण्यात येणार आहे. या नियमानुसार फ्लॅटधारकांना जमिनीचेही मालक असण्याचा लाभ मिळेल.

ज्या जमिनीवर इमारत उभी आहे तेथील फ्लॅटधारक घरे विकत घेऊनही त्या जमिनीचे मालक कधीच झाले नव्हते. गावकुसात जमीन घेतल्यानंतर सातबारावर नाव लागते, तसे इमारतीत घर विकत घेणार्‍याचे नाव लागत नव्हते. ती जमीन मूळ मालकाच्या नावावर कायम असायची. मात्र आता डिम कॉन्व्हेस झाल्यानंतर फ्लॅटधारकाचे आपल्या घराबरोबर प्रॉपर्टी कार्डवर नाव लागलेले असेल.

First Published on: August 29, 2019 6:01 AM
Exit mobile version