सलग सहाव्या दिवशी महापूराचे थैमान

सलग सहाव्या दिवशी महापूराचे थैमान

Maharashtra Floods : काँग्रेस नगरसेवकांचेही पुरग्रस्तांसाठी एक महिन्याचे मानधन

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना महापूराने वेढलेले आहे. सलग पाच दिवस झाले असून सुद्धा कोल्हापूर आणि सांगलीतील पूराची पातळी ही पाहिजे तेव्हढी कमी झालेली नाही. पावसाची संततधार ही अजूनही सुरुच आहे. आतापर्यंत प्रशासन, लष्कर, नौदल, एनडीआरएफ यांच्या मदतीने २ लाख पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल होत आहे. शुक्रवार पर्यंत कोल्हापुरातील पूराचे पाणी दीड फूट कमी झालं आहे. तसेच सांगलीतील पाणी हे संथ गतीने ओसरत आहे. अजूनही लष्कर, नौदल, एनडीआरएफच्या साहाय्याने मदतकार्य सुरु आहे.

या महापूरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत प्रशासनाने सुरक्षा पथक पाठवण्यास विलंब केल्यामुळे नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. कुठलेही मंत्री पाहणी करण्यासाठी गेलेतर स्थानिक नागरिक मंत्र्यांना चार दिवस कुठे होतात? असा प्रश्न विचारत आहेत. प्रशासनाने शुक्रवार पासून पूरग्रस्तात अडकलेल्या नागरिकांना अन्न देण्यास सुरुवात केली आहे. सलग चार दिवस कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरात अडकलेले नागरिक उपाशी होतं.

कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ही ५८ इंचावर आहे. तसेच पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही १ फुट इतकी घटली आहे. गंगापूर धरणातून ७ हजार क्यूसेक्स पाण्याच्या विसर्ग होत असून पिण्याच्या पाण्याची सोय होत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. यादरम्यान शिरोळा तालुक्यातील गावातले नागरिक अजूनही पुरात अडकले आहे. ते सर्व नागरिक मदतीची प्रतीक्षा करत आहेत. नौदलाने त्या गावातल्या नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या गावातल्या नागरिकांना वाचवण्यासाठी सकाळी ६ वाजताच नौदलाची १४ पथकं त्या दिशेने रवाना झाली आहेत. सलग सहाव्या दिवशी कोल्हापूरात आणि सांगलीत महापूराने थैमान घातलं आहे.


हेही वाचा – ‘पूरग्रस्त भागातील नागरीकांना मदतीसाठी १५४ कोटी रुपये वितरीत’


 

First Published on: August 10, 2019 10:26 AM
Exit mobile version