शिरुरमध्ये ४१ विद्यार्थ्यांना विषबाधा

शिरुरमध्ये ४१ विद्यार्थ्यांना विषबाधा

प्रातिनिधीक फोटो

पुण्यातील शिरुर तालुक्यात आज विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडलेली आहे. कान्हूर मेसाईच्या विद्याधाम प्रशालेतील शालेय पोषण आहाराच्या खिचडीतून ही विषबाधा घडलेली आहे. तब्बल ४१ विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली असून मुलांना उलट्या आणि मळमळीचा त्रास होत होता. या शाळेतील तब्बल ३५० विद्यार्थ्यांनी पोषण आहारातून शिजवलेली खिचडी खाल्ली होती.

तांदाळाच्या खिचडीचा झाला त्रास

शनिवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली असून शाळेतील ३५० विद्यार्थ्यांनी व ४ शालेय शिक्षकांनी ही खिचडी खाल्ली होती. ही खिचडी खाल्यानंतर ४१ विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्रास होताच तातडीने स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करायला सुरुवात केली.

सर्व विद्यार्थी स्थिर

काही विद्यार्थ्यांना मळमळू लागल्यानंतर खबरदारी म्हणून इतर विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप करण्यात आले नाही. ४१ विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

First Published on: December 22, 2018 4:30 PM
Exit mobile version