साखरपुड्याच्या जेवणातून ४५ जणांना विषबाधा

साखरपुड्याच्या जेवणातून ४५ जणांना विषबाधा

प्रातिनिधीक फोटो

नांदेड येथे अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४५ जणांना ही विषबाधा झाली असून त्यांच्यावर जलधरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरु आहेत.

अशी झाली विषबाधा

नांदेड येथील जवारसिंग मेरसिंग पडवळे यांच्या मुलाचा साखरपुड्याचा कार्यक्र आज सायंकाळी ४ वाजता सावरगाव तांडा येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाच्या भाजीत पाल पडली. या भाजीमुळे पंगतीत जेवणाऱ्यांना विषबाधा झाली. पहिल्या पंगतीत बसणाऱ्यांना अचानक उलट्यांचा त्रास होण्यास सुरुवात झाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी इस्लापूर येथील डॉक्टरांना जलधरा येथे जाण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी या सर्वांना अन्नातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

या व्यक्तींना झाली विषबाधा

गोबल पेठोड (६०), फलुसिंग पेठोड (६०), उत्तम तगरे, गौतम पोळे (२१), बसीम अहमद (३०), मंगलसिंग पेळे (६०), दत्ता चौफळे (६०), प्रदीप तगरे (१०), बालगिव चौफाडे (५०), मलैश चौफाडे (६), गोविंदसिंग साबळे (४०), देविसिंग पेळे (६०), नारायण सांबळे (६०), रबत बालसिंग (३५), हरासिंग चौफाडे (६०), पी. भागवन सिंग (२२), मायचंद पडवळे (६०), प्रतापसिंग सांबळे (६०), लालाराम पेळे (६०), चंद्रसिंग पडवाळे (६०), सखाराम एस़ (३२), भागसिंग चौफाडे (६०), तुकाराम खसवत (६०), गणपत चौफाडे (६०), निरज खसवत (२७), न्यायसिंग पंढारे (५५), बी. एम. साबळे (५२), विष्णू साबळे (६५), माधवसिंग पोळे (३८), अमरसिंग पोळे (५०), जवासिंग पडवोळे (५५), रोहिदास पोळे (४०), हरिदास बस्सी (४०), दौलतराम बस्सी (३२), दजनसिंग खसवत (४५), सीताराम साबळे (३५), नानक चौफाडे (५३), नियालसिंग पोळे (६०), जवारसिंग चौफाडे (४७), अनिता पडवळे (१६), रघुनाथ पडवळे (७७), दशरथ चौफाडे (३५), कमलबाई चौफाडे (३८), देवसिंग चौफाडे (४०)

First Published on: November 26, 2018 10:21 PM
Exit mobile version