सोलापूर: करमाळ्यातील नरभक्षक बिबट्याला केले ठार; दोनशे जण होते मागावर

सोलापूर: करमाळ्यातील नरभक्षक बिबट्याला केले ठार; दोनशे जण होते मागावर

धुमाकूळ घालणाऱ्या आणि आतापर्यंत तीन जणांचे प्राण घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला यश आले आहे. डॉ. धवलसिंह पाटील यांच्या गोळीने बिबट्याला वांगी नंबर ४ रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात यश आले आहे. बिबट्याला ठार करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून तब्बल २०० जण मागावर असल्याची माहिती समोर आली आहे.

तीन गोळ्या फायर करत केले ठार

काही दिवसांपासून बिबट्याने तालुक्यात दहशत पसरवली होती. या बिबट्यांने आतापर्यंत तिघांचा बळी घेतला होता. यामध्ये ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेले कल्याण फुंदे यांना ठार केले होते. तर अंजनडोह येथील लिंबुणीच्या बागेत लिंबे गोळा करण्यासाठी गेलेल्या जयश्री शिंदे यांच्यावरही हल्ला केला होता. धक्कादायक बाब म्हणजे या बिबट्याने दोन्ही व्यक्तींना मारताना त्यांचे मुंडके धडावेगळे केले होते. त्यामुळे शासनाने या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश द्यावेत, अशा मागण्या केल्या जात होत्या.

दरम्यान, अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी १५ फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर तीन गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.


हेही वाचा – आंजर्ले येथे पुण्यातील सहा पर्यटक बुडाले; तिघांचा मृत्यू


 

First Published on: December 18, 2020 7:37 PM
Exit mobile version