जुन्नरमधील ‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद

जुन्नरमधील ‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद

प्रातिनिधिक फोटो

मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा वावर आहे. याच परिसरातील पिंपरी बुद्रुकमध्येही एका बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडला होता. मात्र, अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह अन्य काहीजणांनी त्यांचा जीव धोक्यात घालून या बिबट्याला जेरबंद केले आहे. वन विभाग कर्मचारी आणि जुन्नर बिबट निवारा केंद्राच्या जवानांनी हे चित्तथरारक रेस्क्यू पार पाडले. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी बुद्रुक गावात हा बिबट्या गावकऱ्यांना दिसला होता. गावकऱ्यांनी याची माहिती तातडीने वन विभाग आणि जुन्नर बिबट निवारा केंद्राल दिली. त्यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी काही वेळातच हे अधिकारी तातडीने पिंपरी बुद्रुक गावात पोहचले. मात्र, तो पर्यंत बिबटया घनदाट झुडपात नाहीसा झाला होता. त्यातही सायंकाळच्यावेळी अंधार पडू लागल्यामुळे घनदाट झाडी-झुडपातून त्या बिबट्याला शोधणं हे खूप मोठं आवाहन होतं.

थरारक रेस्क्यू ऑपरेशन…

बिबट्या हातातून निसटला तर धोकादायक ठरू शकतो हे माहित असतानाही, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रेस्क्यू टीमच्या अधिकाऱ्यांनी त्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, बराच वेळ प्रयत्न करुनही बिबट्या स्वतःहून बाहेर पडत नव्हता, दुसरीरडे अंधारही वाढत चालला होता. बराच वेळ झाला तरी चपळ अन बलवान बिबटया घनदाट झुडपातून बाहेर येत नव्हता यावरून तो आजारी असावा हे वनविभाच्या आणि बिबट निवर केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर रेस्क्यू टीमने सापळा रचून चारही बाजूने त्या बिबट्याला घेरले. त्याला जिवंत जेरबंद करण्यामध्ये रेस्क्यु टीमला झुडपांचा अडसर येत असल्यामुळे शेवटी बिबट्याला बेशुद्ध केले. जेव्हा बिबट्या बेशुद्ध झाल्याची खात्री झाली तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान या चित्तथरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर रात्री उशिरापर्यंत बिबट्यावर उपचार सुरू होते.

पाहा : ‘झुंड’ चित्रपटाच्या सेटवर बिग बींची फुटबॉल प्रॅक्टिस 

First Published on: December 15, 2018 2:40 PM
Exit mobile version