२०२४पर्यंत शिवसेनाला कुठेच ठेवणार नाही, निलेश राणेंनी शिवसेनेला डिवचले

२०२४पर्यंत शिवसेनाला कुठेच ठेवणार नाही, निलेश राणेंनी शिवसेनेला डिवचले

‘शिवसेना नारायण राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल विनायक राऊतचे आम्ही १० वेळा पुतळे जाळले, अशा एकेरी शब्दात बोलतानाच बाळासाहेब ठाकरे गेले. तेव्हाच त्यांची शिवसेना संपली. आता मोगलांचा राज्य आहे’, अशी टीका करत पुन्हा एकदा माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

शिवसेनेची आणि विनायक राऊत यांची औकात नाही

‘शिवसेना राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल विनायक राऊतचा पुतळा आम्ही १० वेळा जाळला. एवढी औकात शिवसेनेची पण, नाही आणि विनायक राऊतची पण नाही. विनायक राऊत आणि शिवसेनेचा मी रोज वचपा काढणार. २०२४ अजून खूप लांब आहे. ग्रामपंचायतीमध्ये आडवच केलं ना आम्ही शिवसेनेला. त्यामुळे आता २०२४ पर्यंत शिवसेना कुठेच ठेवायची नाही हे आमचं ठरलं आहे’, असं सांगतानाच शिवसेनेचे फक्त ५६ आमदार आहेत ते घालवायला किती वेळ लागतो असं ते म्हणाले. त्यावेळी भाजप सोबत होती म्हणून ५६ आले’, असाही टोला त्यांनी लगावला.

सुशांत, दिशाच्या प्रकरणात आदित्य ठाकरे

‘सुशांतसिंग राजपूत, दिशा सालीयान प्रकरणामध्ये आम्ही आदित्य ठाकरे यांचे नाव घेतलेलेच आहे. या दोघांच्याही घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे. आम्ही त्याच भागात राहतो. त्यामुळे आम्हाला सगळं माहीत आहे. किमान ३० ते ४० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत गेले कुठे. हे कोणासाठी झाकलं गेलं हे लोकांना कळलेलं आहे. बिहार निवडणुकीत आदित्य ठाकरे प्रचाराला जाणार अशी घोषणा झाली. मात्र, हे भिऊन मातोश्रीच्या बाहेर पडले नाहीत’, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेत सगळे जनाब आहेत

‘बाळासाहेबांची शिवसेना ते गेले तेव्हाच संपली आता तिकडे सगळे जनाब आहेत’, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली. ‘बाळासाहेबांना जनाब म्हणणारे लोक आता आले आहेत शिवसेनेमध्ये. त्यांच्याकडून तुम्ही शिवशाहीची अपेक्षा ठेऊ नका. मोगलांचा राज्य आहे. औरंगाबादचे अजूनही ते संभाजीनगर करू शकले नाहीत. काँग्रेसवाल्याना औरंगजेब जास्त जवळचा आहे. पण, शिवसेना काही बोलू शकत नाही कारण कुबड्यांचं सरकार आहे’. असेही ते म्हणाले.


हेही वाचा – पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन; बाहेर फिरण्यास बंदी


 

First Published on: February 21, 2021 2:05 PM
Exit mobile version