माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे ‘भारत जोडो यात्रे’त 11 किलोमीटर चालले; विरोधकांमध्ये चर्चांना उधाण

माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे ‘भारत जोडो यात्रे’त 11 किलोमीटर चालले; विरोधकांमध्ये चर्चांना उधाण

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात ‘भारत जोडो यात्रा’ काढली जात आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात पोहोचली आहे. कॉग्रसेच्या या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत. अनेक पक्षातील तसेच, समर्थक या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. त्यानुसार, या यात्रेमध्ये आतापर्यंत बऱ्याच नेतेमंडळींनी सहभाग घेतला. मात्र, या नेत्यांमधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती खास ठरली. कारण वयाच्या 82व्या वर्षीही सुशीलकुमार शिंदे यांनी आपण फिट असल्याचे या यात्रेत चालून दाखवले. (Former Union Minister Sushilkumar Shinde Active In Bharat Jodo Yatra)

कॉंग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात असून, सुशीलकुमार शिंदे यांनी या यात्रेत सहभाग घेतला. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत ते तब्बल 10-11 किलोमीटर चालले. यावेळी वयाच्या 82व्या वर्षी देखील सुशीलकुमार शिंदे शारीरिकदृष्ट्या खूप तंदुरुस्त असल्याची प्रचिती आली.

परंतु, सुशीलकुमार शिंदे यांच्या यात्रेतील हजेरीमुळे विरोधकांमध्ये चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळते. सुशीलकुमार शिंदे पुन्हा राजकारणात सक्रिय होतील की काय, या चिंतेतून विरोधकांची झोप उडाली, अशी चर्चा आहे.

देशाच्या राजकारणात बलाढ्य नेत्यांपैकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे एक आहेत. सुशीलकुमार शिंदे हे गेल्या काही वर्षात राजकारणापासून लांब होते. मात्र, आता पुन्हा एक ते राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या माध्यमातून सरकारी नोकरी सोडून राजकारणात एन्ट्री केलेल्या सुशीलकुमार शिंदेंची ताकद देशाच्या राजकारणात वाढली होती.


हेही वाचा – संजय राऊतांचा बदलला सूर अन् नूर! भाजपाबद्दल चकार शब्द नाही, लक्ष्य फक्त शिंदे गट!!

First Published on: November 10, 2022 12:46 PM
Exit mobile version