लॉकडाऊन : आजपासून बँक खात्यात पैसे जमा होणार; २० कोटी महिलांना मिळणार लाभ

लॉकडाऊन : आजपासून बँक खात्यात पैसे जमा होणार; २० कोटी महिलांना मिळणार लाभ

पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानवर आरोप

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉक डाऊन आहे. या संकटाच्या वेळी गरिबांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये जाहीर केल्यानुसार पुढील तीन महिन्यांसाठी सर्व २० कोटी महिला जन धन खात्यात दरमहा ५०० रुपये सरकारच्या वतीने जमा केले जाणार आहे. शुक्रवारी सर्व महिला जन धन खात्यातील लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळण्यास प्रारंभ झाला आहे. कोरोनाच्या सामना करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे जनता कामधंदे सोडून घरात बसली आहे. तसेच जनजीवन ठप्प झाले आहे. याचा सर्वाधिक फटका हातावर पोट भरणाऱ्या मजुरांवर बसू लागला आहे. अशा कुटुंबांना साहाय्य करण्यासाठी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गरीब महिलांच्या जनधन खात्यांमध्ये दर महिन्याला ५०० रुपये जमा केले जाणार आहेत. तसेच हे पैसे आजपासून जमा केले जाणार आहे. साधारण २० कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) आजपासून महिलांच्या खात्यामध्ये ५०० रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ३ ते ९ एप्रिल दरम्यान पैसे बँक खात्यात भरण्याची प्रक्रिया सुरू राहील. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत पुढील तीन महिने महिलांच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा होतील. यात कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी महिलांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक लक्षात घेण्यात येईल आणि त्यानुसार ३ ते ९ एप्रिल दरम्यान पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

नागरिकांना पैसे कधी मिळणार?

* खाते क्रमांकाच्या शेवटी ० किंवा १ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात आज म्हणजे ३ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
* खाते क्रमांकाच्या शेवटी २ किंवा ३ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात ४ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
* खाते क्रमांकाच्या शेवटी ४ किंवा ५ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात ७ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
* खाते क्रमांकाच्या शेवटी ६ किंवा ७ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात ८ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
* खाते क्रमांकाच्या शेवटी ८ किंवा ९ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात ९ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.

सोशल डिस्टसिंगकडे बँकांचा जास्त भर

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बँकांनी सोशल डिस्टसिंगकडे विशेष लक्ष दिले आहे. बँकांनी त्यांच्या खातेदारांचा खाते क्रमांक लक्षात घेऊन एक वेळापत्रक तयार केले आहे. त्यांच्या आधारे खाते धारक त्याच्या खात्यातून पैसे काढू शकतात. हे वेळापत्रक याच महिन्यात लागू करण्यात येईल, अशी माहिती बँकांनी दिली आहे.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क लागू नाही

लाभार्थी महिलांना बँकेतून पैसे काढताना सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. म्हणून बँक वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. जे लाभार्थ्यांच्या बँक खात्यांच्या शेवटच्या अंकावर आधारित आहे. एप्रिल महिन्यानंतरही लाभार्थी महिला त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही कामाच्या दिवशी बँकेतून पैसे काढू शकतात. बँकांनी सर्व लाभार्थ्यांना यात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. तसेच, सरकारी निर्देशानुसार सध्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क लागू होणार नाही.

First Published on: April 3, 2020 4:52 PM
Exit mobile version