नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात ‘इंधन तुटवडा’ होण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण..

नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात ‘इंधन तुटवडा’ होण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण..

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळील नागापुर येथे ऑइल डेपो आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जातो. मात्र, टँकर चालकांनी आंदोलन पुकारल्यामुळे हा पुरवठा खंडित झाला असून पुढील २ दिवसांत नाशिक सह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील एकूण ८ जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा होऊन पेट्रोल पंप बंद पडण्यास सुरवात होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेल व्यतिरिक्त गॅसचाही  पुरवठा खंडित झाला आहे.

दरम्यान, नागापुर ग्रामस्थ आणि टँकर चालक यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. ऑइल आणि गॅस डेपोच्या आतमध्ये टँकर उभे करणे अपेक्षित आहे. मात्र, टँकर सर्रास डेपोच्या बाहेर रस्त्यावर उभे केलेले असतात. त्यामुळे नागापुर ग्रामस्थांना मोठा मनस्थाप सहन करावा लागतो. तसेच रस्त्यावरच मोठ मोठे टँकर उभे असल्याने आपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच ज्या टँकर मध्ये डेपो मधून इंधन भरले आहे आणि त्या टँकरने नियोजित पेट्रोल पंप कडे जाणे अपेक्षित आहे. ते टँकर देखील डेपोच्या बाहेरच उभे असतात. त्यातून अपघात तसेच टँकर मधून डिझेल, पेट्रोल चोरीच्या घटना देखील झाल्या आहेत. यावरून ग्रामस्थ आणि टँकर चालक यांच्यात संघर्ष सुरू आहे.

दरम्यान, हा संघर्ष सुरू असतानाच रविवारी (दि. २५) इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या डेपो समोर एका टँकरचा नागापुर ग्रामस्थ वाहन चालकाला धक्का लागल्यावरुण त्यांच्यात वाद झाला. त्यांच्यातील बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. त्याचवेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले. संपूर्ण तनावपूर्ण परिस्थिती असताना संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट डेपो समोर उभ्या असलेल्या अनेक टँकरच्या काचा फोडल्या. तसेच गॅस प्लांट मधून बाहेर येत असलेल्या एका टँकर चालकालाही मारहाण केली. या घटनेनंतर टँकर चालकांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, नाशिक सह उत्तर महाराष्ट्र आणि मारठवड्यातील अनेक जिल्ह्यातील इंधनाचा पुरवठा खंडित झाला आहे.

या जिल्ह्यात निर्माण होऊ शकतो तुटवडा 

नागापुर याठिकाठी सर्वच इंधन कंपन्यांचे डेपो आहेत. त्यामुळे तिथून इंधन पुरवठा खंडित झाला तर त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्हयासह मराठवाड्यातील छ.संभाजीनगर , जालना, बीड, नांदेड या जिल्हयानवर होणार आहे. टँकर चालकांचा संप असाच सुरू राहिला तर मंगळवार दुपार नंतर या जिल्ह्यांमधील पेट्रोल पंप नबंद पडायला सुरवात होऊ शकते.

First Published on: June 26, 2023 12:34 PM
Exit mobile version