घरगुती गॅस, सीएनजी महागणार; सामान्यांच्या खिशाला कात्री

घरगुती गॅस, सीएनजी महागणार; सामान्यांच्या खिशाला कात्री

घरगुती गॅस, सीएनजी महागणार; सामान्यांच्या खिशाला कात्री

सामान्य नागरिकांना दरदिवशी अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहेत. त्या संकटामध्ये भर पडली आहे ती म्हणजे महागाईची. सामान्य नागरिकांचे दर महिन्याचे बजेट हे ठरलेले असते. मात्र, १ एप्रिल पासून आता बजेट कोलमडणार आहे. सरकार घरगुती गॅसच्या किंमती १८ टक्कांनी वाढणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. १ एप्रिल २०१९ पासून नव्या किंमती लागू होणार आहेत. नव्या घरगुती गॅस धोरण २०१४ अंतर्गत दर सहा महिन्यांनी नैसर्गिक गॅसच्या किंमती या ठरत असतात. या किंमत ठरण्याचा फार्म्युला परदेशी बाजारांच्या किमतीवर आधारित असतो. सरकारच्या निर्णयामुळे वाहनांसाठी वापरण्यात येणारा सीएनजी आणि घरगुती जेवणासाठी वापरण्यात येणारा पीएनजी गॅसच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. एक एप्रिलला दरवाढ झाली असता ही सलग चौथी दरवाढ ठरणार आहे.

नैसर्गिक गॅसच्या किमतीत वाढ

नैसर्गिक गॅस वितरक देश असलेल्या अमेरिका, रशिया आणि कॅनडा या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार भारतातल्या गॅसच्या किंमती या ठरत असतात. सध्या पाइप गॅसचे दर २९ रुपये आहेत. तर सीएनजीचे दर ४४.२२ रुपये आहेत. मात्र, एप्रिल-सप्टेंबर २०१९ मध्ये नैसर्गिक गॅसच्या किंमती ३.३६ डॉलरवरून ३.९७ डॉलर होणार आहे. त्यामुळेच घरगुती गॅसच्या किंमती १८ टक्कांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच गेल्या वर्षी १ ऑक्टोबरमध्ये १० टक्कांनी वाढ झाली होती. नैसर्गिक वायू उत्पादनामध्ये आघाडीवर असणाऱ्या ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आदी कंपन्यांना मात्र या नैसर्गिक गॅस दरवाढीचा फायदा होणार आहे.

First Published on: March 15, 2019 3:45 PM
Exit mobile version