महिला जवान गायत्रीच्या बहिणीचे वकील होण्याचे स्पप्न होणार साकार

महिला जवान गायत्रीच्या बहिणीचे वकील होण्याचे स्पप्न होणार साकार

ओझर : निफाड तालुक्यातील देवगाव, जिल्हा नाशिक येथील सीमा सुरक्षा दलात रुजू झालेल्या महिला जवान गायत्री विठ्ठल जाधव यांच्या दुर्दैवी निधनानंतर तिच्या लहान बहिणीचे वकील होण्याचे स्पप्न पूर्ण करण्यासाठी कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार सरसावले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी जाधव कुटुंबियाची भेट घेवून गायत्रीचे आई-वडील, मामा गणेश कोकणे यांचे नुसते सांत्वनच केले नाही तर ज्या ज्या खासगी रुग्णालयांमध्ये गायत्रीच्या उपचारादरम्यान अतिरिक्त खर्च लावण्यात आला, तो परत मिळवून देण्यासह, त्यांचे इन्शुरन्सचे अडकलेले पैसे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. गायत्रीचे आई-वडील मोलमजुरी करतात. गायत्रीच्या पश्चात तीन बहिणी आहेत. गायत्रीच्या नोकरीवर ती आपल्या कुटुंबाचे स्पप्न साकार करु शकली असती, मात्र वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी झालेल्या तिच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या परिवारासाठी आमदार रोहित पवार यांनी भाऊ म्हणून धावून जाणे हे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून घेण्यासारखे आहे.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गायत्रीने 2021 साली स्टाफ सिलेक्शनच्या सीमा सुरक्षा बलाच्या परीक्षेत यश संपादन केले होते. त्यानंतर राजस्थान येथील अलवर येथे ट्रेनिंग पूर्णत्वास जात असताना खड्यात पडून तिचा अपघात झाला. पुढे तिच्या मेंदूवर जयपूर येथील रुग्णात शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. तिला पुन्हा त्रास जाणू लागल्याने अधिक उपचारासाठी एम्स दिल्ली येथे संदर्भ देण्यात आला. मात्र तिथे जाण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. गायत्रीच्या या दुर्दैवी घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी मदतीसाठी धावून जाणे हे समाजात माणुसकी पेरणारे कृत्य ठरते.

गायत्रीच्या जाण्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिच्या बहिणीचे वकील होण्याचे स्वप्न साकार करण्याचे सत्कार्य रोहित पवारांनी उचलले आहे. जिल्हा वकील संघाच्या वतीने देखील योग्य ते सहकार्य करण्यात येईल. : अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक वकील संघ

First Published on: November 30, 2022 12:15 PM
Exit mobile version