मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंनाच हवं होतं, भुजबळांविषयी केलेल्या विधानाचा गिरीश महाजनांनी घेतला समाचार

मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंनाच हवं होतं, भुजबळांविषयी केलेल्या विधानाचा गिरीश महाजनांनी घेतला समाचार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळांविषयी केलेल्या विधानाचा भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

छगन भुजबळ सोबत राहिले असते, तर त्यांनाच मुख्यमंत्री केलं असतं, असं विधान उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमात बोलताना केलं. परंतु या विधानावरून गिरीश महाजनांनी धुळ्यात पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच व्हायचं होतं. मग कुणीही त्यांच्यासोबत असो. मग ते एकनाथ शिंदे असते किंवा भुजबळ असते तरी त्यांना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री केलं नसतं, असं गिरीश महाजन म्हणाले.

छगन भुजबळांबाबत काय-काय बोलत होते आणि शिवसेना भुजबळांबद्दल काय काय बोलत होती, हे आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. मी तर भुजबळ फुटल्यापासून ३० वर्ष सोबतच आहे. यांची किती टोकाची भाषा होती? पण आज हे एकमेकांना गुदगुल्या करत आहेत, असं गिरीश महाजन म्हणाले.

भाजपा आता वाणी-ब्राह्मणांचा पक्ष न राहता बहुजनांचा पक्ष झालाय, असं विधान एकनाथ खडसेंनी केलं होतं. त्यावरून महाजनांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे. माणूस फक्त जातीवर समाजात मोठा होत नाही. तो त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळेही मोठा होतो, असं प्रत्युत्तर महाजनांनी खडसेंना दिलंय.


हेही वाचा : ठाकरेंनी पक्षाचं नाव बदलून रडकी सेना ठेवावं, आशिष शेलारांची टीका


 

First Published on: October 14, 2022 3:24 PM
Exit mobile version