आधी मला घटस्फोट द्या, मग नवऱ्याला फासावर लटकवा

आधी मला घटस्फोट द्या, मग नवऱ्याला फासावर लटकवा

दिल्ली निर्भया प्रकरण

माझा पती दोषी आहे, त्याला फासावर लटकवण्याआधी माझी मुक्ती करा. मला त्याची विधवा पत्नी म्हणून नाही जगायच. म्हणूनच त्याला फाशी देण्याआधी मला घटस्फोट द्या अशी दया याचिका निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी असलेल्या अक्षय कुमार सिंह याच्या पत्नीने बिहारच्या औरंगाबाद कोर्टात केली आहे. मला कायदेशीर प्रक्रियेने घटस्फोट घ्यायचा आहे. म्हणूनच मी ही याचिका दाखल करत आहे, असे अक्षय कुमार सिंहची पत्नी पुनिताने स्पष्ट केले आहे.

पक्षकार असलेल्या पुनिताने विभक्त होण्याच्या निर्णय घेतला आहे, घटस्फोट मिळवण हा तिचा हक्क आहे असे पुनिताच्या वकीलाने म्हंटल आहे. म्हणूनच आम्ही औरंगाबाद कोर्टात याचिका दाखल केली आहे. हिंदू विवाह कायद्यना नुसारच पुनिताला विभक्त होता येईल असेही तिच्या वकीलांनी सांगितले. हिंदू कायद्यान्वये बलात्कार यासारख्या प्रकरणात घटस्फोट घेऊन विभक्त होण्याची तरतूद आहे. येत्या२० मार्च रोजी निर्भयाच्या चारही आरोपींना फाशी होणार आहे. त्यामध्ये अक्षय कुमार सिंहचाही समावेश आहे.

First Published on: March 18, 2020 12:04 PM
Exit mobile version