माजी पंतप्रधानांनी दिला काँग्रेसला सल्ला; शिवसेनेला पाठिंबा द्या मात्र…

माजी पंतप्रधानांनी दिला काँग्रेसला सल्ला; शिवसेनेला पाठिंबा द्या मात्र…

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आलेल्या पेच प्रसंगामुळे राज्यातील राजकारणाने धक्कादायक वळण घेतलेले चित्र दिसतेय. अशा परिस्थितीत पहिल्यांदाच एकमेकांविरोधात कित्येक वर्षे विरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी शक्यता सध्या दिसतेय. दरम्यान माजी पंतप्रधान आणि कर्नाटकातील सत्ता गमावलेल्या जेडीएस पक्षाचे नेते एच डी देवेगौडा यांनी काँग्रेस पक्षाला सल्ला दिला आहे.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, यावर लवकरच आपला निर्णय कळवणार आहेत. यावेळी जेडीएसचे देवेगौडा यांनी सल्ला दिला आहे. ‘महाराष्ट्रात काँग्रेस जर शिवसेनेला पाठिंबा द्यायचाच असेल तर त्यांच्यासोबत संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळात रहावे आणि त्यांना सरकार चालवू द्यावे.’, असे देवेगौडा यांनी सांगितले.

 

तसेच, तसेच, जर काँग्रेसला शिवसनेला पाठिंवा तसेच समर्थन द्यायचे असेल तर पुढची पाच वर्ष त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये. असे शक्य असेल तरच जनता काँग्रेसवर विश्वास ठेवतील, असे देखील देवेगौडा यांनी सांगितले आहे.

कर्नाटकमध्ये जसं वातावरण होतं तसं महाराष्ट्रात…

गेल्या दोन वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यात देखील अशीच परिस्थिती उद्भवली होती. तशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रात दिसतेय. कर्नाटकात देखील भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र, तेथेही काँग्रेसने कमी जागा मिळवलेल्या जनता दल सेक्यूलर (जेडीएस) पक्षाला पाठिंबा देत सत्ता स्थापन केली होती. यावेळी कर्नाटक राज्यात काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामे देत हे सरकार तोंडावर पाडले होते. त्यानंतर जनता दलाच्या कुमारस्वामींनी सरकारचा कार्यभार सांभाळला होता.

या संपुर्ण वातावरण निर्मितीमागे भाजपाचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांचे षडयंत्र असल्याचे बोलले जात आहे. यासगळ्या नाट्यानंतर जेडीएसला चांगलाच फटका बसला आहे. त्य़ामुळे या पक्षाच्या प्रमुखाने काँग्रेस पक्षाला मोलाचा सल्ला दिला आहे.


Live: सेनेचे नेते राजभवनाकडे रवाना; लवकरच निर्णय येणार
First Published on: November 11, 2019 6:12 PM
Exit mobile version