आता ‘गोकुळ’चं दूध महागलं! 1 लिटरसाठी मोजावे लागणार इतके पैसे

आता ‘गोकुळ’चं दूध महागलं! 1 लिटरसाठी मोजावे लागणार इतके पैसे

वाढत्या महागाईत आता दूधाच्या दरात देखील सातत्याने वाढ होतेय. यामुळे सर्वसामान्य नागिरकांना आता महिन्याच्या बजेटमध्येही वाढ करावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी अमूल आणि गोवर्धनने दूधाच्या दरात वाढ केली, त्यापाठोपाठ आता गोकूळनेही दूधाचे भाव वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गोकूळ दुधाच्या दरात एक लीटरमागे 2 – ४ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. गोकुळचे फुल क्रीम मिल्कची किंमत यापूर्वी 69 होती, ती आता 3 रुपयांनी वाढवून 72 इतकी करण्यात आली आहे.

अमून डेअरने या महिन्याच्या सुरुवातीलाच दुधाच्या दरात प्रति लीटर 3 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर गोवर्धन कंपनीने 2 रुपयांची वाढ केली, ऑपरेशन आणि मिल्क प्रोडक्शन कॉस्टमध्ये वाढ झाल्याने दूधाच्या किंमतीत वाढ केल्याचं गोवर्धन कंपनीने म्हटले आहे.

11 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. गेल्या वर्षभरात गोकुळ दूध दरात एकूण 12 रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान नव्या दरवाढीनुसार, मुंबई, पुण्यात गोकळुच्या म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर 72 आणि कोल्हापूरात 66 रुपये मोजावे लागणार आहेत. यात गायीच्या दुधासाठी अनुक्रमे 56 व 50 रुपये मोजावे लागणार आहेत. विक्रीसोबत खरेदी दरातही वाढ केली जाणार असून दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दुधाची मागणी वाढत असून पुरवठा कमी असल्याने सगळीकडे दुधाची टंचाई जाणवत आहे. यात उन्हाळ्यात उत्पादनात थोडी घट होत मागणी वाढणार वाढणार आहे. यात सर्वच दूध कंपन्यांनी दूधाच्या दरात वाढ केल्याने आता गोकुळने दरवाढ केली आहे. त्यानुसार म्हैस आणि गायीच्या दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आहे.

अमूलच्या नवीन दरांनुसार, नव्या घोषणेनंतर ग्राहकांना अमूल गोल्डसाठी 66 रुपये प्रति लिटर, अमूल फ्रेशसाठी 54 रुपये प्रति लीटर पैसे मोजावे लागणार आहेत. तर, अमूल गायीच्या दूधासाठी 56 रुपये प्रति लिटर आणि अमूल ए2 म्हशीच्या दूधासाठी 70 रुपये प्रति लीटर मोजावे लागणार आहेत. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.


“एका अपक्षाची गद्दारी खोक्यातून…”; शिवसेना बंडखोर राहुल कलाटेंविरोधात बॅनरबाजी

First Published on: February 11, 2023 3:42 PM
Exit mobile version