टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका, पडळकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका, पडळकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका, पडळकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

राज्यात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार अशी घोषणा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये आदित्या ठाकरेंनीही मोफत लसीकरणाबाबत सांगितले होते. परंतु काही वेळातच आदित्य ठाकरेंनी ट्विट डिलीट करुन दुसरे ट्विट केले आणि ट्विट डिलीट केल्याबाबतचे स्पष्टिकरण दिले होते यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदित्य ठाकरे यांना राज्य सरकारचे लाडके मंत्री म्हणत टोला लगावला आहे. सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ट्विटमुळे आनंद झाला परंतु तो काही क्षणातच विरला असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

राज्यात मोफत लसीकरण करण्यात येणार अशी घोषणा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली. यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले होते. आदित्य ठाकरेंनी लसीकरणाबाबत ट्विट करुन डिलीट केले आणि मोफत लसीकरणाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही तसेच निर्णय झाल्यावर उच्चाधिकार समितीमार्फत घोषणा करण्यात येईल तसेच नागरिकांच्या मनात संभ्रम नको यासाठी ट्विट डिलीट केले असल्याचे दुसरे ट्विट करुन सांगितले आहे. यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्विटवर भाष्य करत निशाणा साधला आहे.

टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका असे पडळकरांनी म्हटले आहे. सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात वाटाघाटी आणि टक्केवारीमुळं लोकहितासाठी जाहीर केलेला संपूर्ण निर्णय महाराष्ट्रासाठी मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये हीच अपेक्षा आहे. अशी खोचक टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण

राज्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. या लसीकरणाचा खर्च राज्याच्या तिजोरीतून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लसीकरणासाठी जागतिक निविदा मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात कोरोना लस मोफत उपलब्ध करुन देण्याचा भाग म्हणून जास्तीत जास्त कोरोना लसी खरेदी करण्यात येणार असल्याचेही मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले होते. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यात मोफत लसीकरण करण्यासाठी जागतिक निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

First Published on: April 26, 2021 3:46 PM
Exit mobile version