ओबीसी समाजासाठी ७०० कोटींच्या योजनांना मंजुरी!

ओबीसी समाजासाठी ७०० कोटींच्या योजनांना मंजुरी!

फाईल फोटो

आगामी लोकसभा आणि राज्यसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने अनेक नवीन योजना राबवणार असल्याच्या घोषणा केल्या आहेत. मात्र, आता केंद्रापाठोपाठ राज्य सरकारच्याही नवनवीन योजनांचा पाऊस सुरु झाला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या काही महत्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ओबीसी समाजासाठी ७०० कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या पाठोपाठ दलित समाजाच्या योजनेच्या घोषणा केल्यानंतर ओबीसी समाजातून नाराजीचा सूर वाढला होता. त्यामुळे ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी ७०० कोटींच्या योजनेची आज घोषणा करण्यात आली आहे. सूत्रांनुसार, आज मंत्रिमंडळ बैठकीत विविध योजनांसाठी ओबीसी महामंडळाला २५० कोटी, भटक्या – विमुक्त महामंडळाला ३०० कोटींची मंजूरी देण्यात आली आहे. शिवाय आतापर्यंत पहिल्यांदाच वडार आणि रामोशी समाजासाठी विशेष पॅकेज जारी करण्यात आलं आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरुपात

First Published on: January 15, 2019 2:08 PM
Exit mobile version