सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळणार – देवेंद्र फडणवीस

सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळणार – देवेंद्र फडणवीस

देशभरात सर्वत्रच दिवाळीचा(diwali 2022) उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी देशातील प्रत्येक बाजारपेठेत गर्दी दिसत आहे. तर दुकानाबाहेरही खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत. दिवाळी एवढ्या काहीच दिवसांवर आली आहे त्यामुळे दिवाळीचा एक वेगळा आणि मस्त माहोलसुद्धा तयार झाला आहे. दरम्यान दिवाळीसाठी मिळणार पगार आणि बोनस याची प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरु असते.

अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस आणि पगार आधीच देण्यात आला आहे. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील माहिती ट्विट करून दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन सरकारी नोकरदारांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी माहिती दिली आहे. 22 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळी आधी दिला जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात देण्यात येत असलेले वेतन ऑक्टोबरमध्येच देण्याचा निर्णय घालण्यात आला आहे.

दरम्यान दिवाळीसाठी या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्यातील पगार दिवाळीपूर्वीच देण्यात येणार आहे. तसे आदेशही देण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना 21 ऑक्टोबर रोजी वेतन मिळणार आहे. दरम्यान शासनाचा हा निर्णय सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारकांना लागू असणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.


हे ही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका, आयएसआय आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत

First Published on: October 18, 2022 5:03 PM
Exit mobile version