अंगणवाडीच्या नवीन इमारती, दुरुस्तीच्या कामांना मंजुरी

अंगणवाडीच्या नवीन इमारती, दुरुस्तीच्या कामांना मंजुरी

अंगणवाडीच्या नवीन इमारती, दुरुस्तीच्या कामांना मंजुरी

जिल्ह्यात अंगणवाडीच्या नवीन १७ इमारतींच्या बांधकामास आणि १५० अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या झालेल्या महिला-बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सभापती रजनी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महिला-बालकल्याण समितीची बैठक झाली. शासनाने एक अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी नऊ लाख रुपयांपर्यंत निधी वाढविला आहे. इमारतींची गरज असल्याबाबतचे तालुकास्तरावरून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून १७ इमारतींच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली. तसेच, अंगणवाडीच्या यापूर्वी बांधलेल्या पण, त्याच्या दुरुस्तीची गरज असलेल्या १५० अंगणवाडींंना प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंत खर्चास मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा – अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्ष

वैयक्तिक योजनेच्या लाभार्थींच्या यादीस मंजुरी

देखभाल दुरुस्तीमधून इमारतीची डागडुजी, रंगरंगोटी यासह छोठे-मोठे कामे करण्यात येतील. स्थानिक लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी इमारतीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन रजनी देशमुख यांनी केले आहे. सन २०१८-१९ मधील वैयक्तिक योजनेच्या लाभार्थींच्या यादीस मंजुरी देण्यात आली आहे. पण, अद्याप प्रस्ताव सादर न केलेल्या लाभार्थींनी दहा डिसेंबरपर्यंत पंचायत समितीकडे प्रस्ताव द्यावेत. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये १२ वी विज्ञान शाखेत ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या १३ विद्यार्थिनींना सुप्रिया शैक्षणिक सवलत योजनेचा लाभ मंजूर केल्याचे सांगण्यात आले.


हेही वाचा – आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी आरोग्य संघटना एकत्र

First Published on: November 27, 2018 4:58 PM
Exit mobile version