जनतेसाठी सरकार तिजोरी खाली करत नाही – धनंजय मुंडे

जनतेसाठी सरकार तिजोरी खाली करत नाही – धनंजय मुंडे

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (फाईल फोटो)

आज मराठवाडा दुष्काळाने होरपळत आहे. निसर्ग कोपतो त्यावेळी आपली तिजोरी खाली करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला होता परंतु हे सरकार तिजोरी शेतकऱ्यांसाठी खाली करण्याचे सोडा एक दमडीही देत नसल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. छत्रपतींचा अपमान केला आहे तो अपमान आपला असून अपमान करणाऱ्या सरकारला बदलायलाच हवे, असे आवाहन मुंडे यांनी कन्नड येथील जाहीर सभेत केले.

काय म्हणाले मुंडे

येणाऱ्या लोकसभेत देशातील १२५ कोटी जनता आता परिवर्तन मागत आहे. आज या शेतकऱ्यांचा कुणीही वाली नाही. सरकारने कर्जमाफी दिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही कर्जमाफी करत छत्रपतींचा अपमान केला असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात शेतकऱ्यांचा मुलगा नसल्याने आज शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे, असेही मुंडे म्हणाले. या सभेला येण्यापूर्वी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर हजरत जरजरी बक्ष दर्गात जावून चादर चढवली. या सभेच्या सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात बुलढाणा जिल्हयातून झाली असून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे दुसरी सभा झाल्यानंतर औरंगाबाद जिल्हयातील कन्नड येथे तिसरी सभा पार पडली.

First Published on: January 21, 2019 4:35 PM
Exit mobile version