मुंबईकरांनो, मदतीसाठी हे आहेत संपर्क क्रमांक

मुंबईकरांनो, मदतीसाठी हे आहेत संपर्क क्रमांक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री जनतेशी फेसबुकवरून साधलेल्या संवादामध्ये मुंबई सोडू नका असे आवाहन केले होते. मुंबईत अनेक राज्यातले नागरिक कामानिमित्ता आहेत. पण त्यांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी अडचणी येत आहेत. म्हणूनच अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने शहराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याअंतर्गत तसेच राज्याबाहेरही प्रवास करण्याचा प्रयत्न करू नका. जिथे आहात तिथेच रहा असे आदेश देत मुख्यमंत्र्यांनी सर्वांची सोय केली जाईल असे स्पष्ट केले होते. त्याअनुषंगानेच आज मुंबईतील विविध सोयी सुविधांसाठीचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

अनेक राज्यातील मुख्यमंत्री मला फोन करत आहेत. उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, बिहारमधून मला फोन आले. विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आमच्या राज्यातील लोकांची प्रवासाची व्यवस्था करा अशी मागणी केली होती. पण करोनाच्या संसर्गामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. हे करोना कॅरिअर इतर राज्यातही हा धोका वाढवतील म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी जिथे आहात तिथेच राहण्याचे आदेश दिले आहेत.

बाहेरील राज्यातील लोकांनी,कामगारांनी मुंबई शहर ,उपनगर अथवा गाव शहर सोडून बाहेर जाऊ नये, कोणतीही अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना मदत केंद्र मार्फत जेवण ,आरोग्य ,निवास,सुविधा निर्माण केल्या जातील। असे आवाहन विभागीय आयुक्त शिवाजी दौड यांनी केले आहे

First Published on: March 28, 2020 3:30 PM
Exit mobile version