“ओबीसी आणि मराठा समाजातील वाद मिटवण्यासाठी सरकारने तोडगा काढावा”, विजय वडेट्टीवारांची मागणी

“ओबीसी आणि मराठा समाजातील वाद मिटवण्यासाठी सरकारने तोडगा काढावा”, विजय वडेट्टीवारांची मागणी

मुंबई : राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजातील वाद वाढणार नाही. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यात मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहे. मंत्री छगन भुजबळ आणि विरोधक विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारमधील मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्यास विरोध केला आहे.

ओबीसी नेत्यांना टार्गेट केले आणि त्यांची घरे जाळली गेली, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. यामुळे मराठा आणि ओबीसी यांच्यातील वाद अजून पेटणार का? या प्रश्नावर विजय वडेट्टीवार म्हणाले, “सरकारच्या मुखिया राज्यातील कॅप्टन (मुख्यमंत्री) आणि उपकॅप्टनने ( उपमुख्यमंत्री) मिळून एकदा स्पष्टता आणली पाहिजे. आता आंदोलन संपले आणि हा वाद वाढणार नाही. यासाठी तोडगा काढला पाहिजे आणि तो तोडगा कोण काढू शकतो. हा तोडगा सरकारने काढला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही”, असेही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा – मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे – विजय वडेट्टीवार

ओबीसींना जे मिळाले पाहिजे ते मिळत नाही

ओबीसी सर्वेक्षण देताना घटनेत म्हटले की, दर दहा वर्षांनी त्यांचे सर्वेक्षण व्हावे, यासंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले, “मी मंत्री असताना सर्वेक्षणाचे काम केले होते. दिल्लीच्या कंपनीला हे काम दिले होते. दुर्दैवाने आमचे सरकार गेले, मी अनेक जातीच्या लोकांना भेटलो, समूह आणि शिष्टमंडळांना भेटलो. मला आजही त्या जातीतील लोक दिसतात की, त्यांची अवस्था खूप वाईट आहे. यात जे बारा बलुतेदार आणि नाथ जोगी जे आहेत. बहुरूपी, वडार या सर्व जाती ओबीसींमध्ये आहेत. या सर्व जातींची अवस्था इतकी वाईच आहे की, त्यांना काहीच मिळालेले नाही. ‘बळी तो कान पिळी ना’, जो मोठा असतो तो सर्व काही करतो. ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ मग आम्ही छोट्या छोट्या जातीने काय करायचे, आमची काय प्रगती होणार. ही सर्व परिस्थिती पाहाता यावर ओबीसीमध्ये असलेल्या लोकांना जे मिळायला हवे, ते मिळत नाही ही माझी मागणी आहे.”

 

First Published on: November 7, 2023 4:36 PM
Exit mobile version