सरकारचा मोठा निर्णय; कोरोनाच्या सर्व चाचण्या आता मोफत होणार

सरकारचा मोठा निर्णय; कोरोनाच्या सर्व चाचण्या आता मोफत होणार

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असताना सरकाकरने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि औषधोपचार मोफत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी यांनी आज दिली.

कोरोनाची चाचणी करण्यासाठी खाजगी लॅब ४ हजार ४०० रुपये आकारत होती, तर शासकिय रुग्णालयात काही प्रमाणात शुल्क आकारलं जात होतं. कोरोनाच्या चाचण्या करणे गरीबांना परवडणारं नाही. तसंच औषधोपचाराचा खर्च देखील न परवडणारा आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे मोफत करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी लोकांनी पुढे यावं तसंच कोरोनाग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा – LockDown : वीज ग्राहकांचा स्थिर व मागणी आकार रद्द करा; राज्य सरकारला साकडे


नागरिक चाचणीसाठी आणि उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी पुढे येत नाही आहेत. मात्र, या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणं शक्य होणार आहे. या निर्णयाने कोविड-१९ ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. तसंच जास्तीत जास्त चाचण्या होतील, असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवला.

First Published on: April 24, 2020 10:50 PM
Exit mobile version