दिग्विजय सिंह यांना बदनाम केले जातोय – सचिन सावंत

दिग्विजय सिंह यांना बदनाम केले जातोय – सचिन सावंत

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह

कोरेगाव-भीमा दंगलीशी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना पुणे पोलीस बदनाम करत आहेत. हा प्रयत्न मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी असून पुणे पोलीस सरकारच्या इशाऱ्यावर चालणारे प्यादे बनले आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

काय म्हणाले सावंत

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले, पुणे पोलिसांची विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव दंगलीच्या संदर्भात सुनावणी करताना पुणे पोलीस सातत्याने माध्यमांसमोर का जात आहेत? असा प्रश्न विचारत पुणे पोलिसांचा समाचार घेतला होता. असे असतानाही पुणे पोलिसांचे अधिकारी माध्यमांशी जाणीवपूर्वक संवाद साधत आहेत. त्यांचा हेतू पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत मदत व्हावी हाच आहे. जिवंत बॉम्बचा साठा सापडल्याप्रकरणी सनातन संस्था आणि शिवप्रतिष्ठानच्या लोकांची चौकशी केली जात नाही. तसेच भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य सुत्रधार मिलिंद एकबोटे व संभाजी यांची साधी चौकशी न करता एल्गार परिषदेचा या दंगलीशी संबंध जोडून त्यांची चौकशी केली जात असल्याचे सावंत म्हणाले.

First Published on: November 19, 2018 5:07 PM
Exit mobile version