महाराष्ट्रात राहताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करा, वादग्रस्त विधानानंतर राज्यपालांची सारवासारव

महाराष्ट्रात राहताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करा, वादग्रस्त विधानानंतर राज्यपालांची सारवासारव

मराठी माणसांच्या विरोधात वादग्रस्त विधानाने अडचणीत आलेल्या राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी माफी मागितल्यानंतर त्यांनी मंगळवारी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. गुजराती सांस्कृतिक फोरम संस्थेच्या कार्यक्रमात त्यांनी स्थानिक संस्कृतीशी एकरूप झाले पाहिजे. महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आव्हान केले. राज्यपालांचे हे आवाहन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

गुजराती सांस्कृतिक फोरम या मुंबईतील सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या11 प्रसिद्ध गुजराती व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. त्यांनी भारत हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा इत्यादी बाबतीत स्वतंत्र ओळख असली तरीही सर्व भारतीयांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान आहे. देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपताना स्थानिक संस्कृतीशी एकरूप झाले पाहिजे, तसेच महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्रात आल्यावर आपण स्वतः ५-६ महिन्यांत चांगली मराठी शिकलो. आपण राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमधील दीक्षांत समारंभाचे संचालन तसेच चेंबर ऑफ कॉमर्स आदी व्यापारविषयक संस्थांमध्येही मराठी भाषेतून किंवा शक्य नसल्यास हिंदीतून करावे असे आग्रहाने सांगत असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसचा शुक्रवारी राजभवनावर मोर्चा –

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे वक्तव्य महाराष्ट्र विरोधी असून मुंबईकरांचा अपमान करणारे आहे. त्यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करीत मुंबई काँग्रेस येत्या 5 ऑगॅस्टला राजभवनावर मोर्चा काढणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मंगळवारी जाहीर केले.

First Published on: August 3, 2022 8:53 AM
Exit mobile version