महिला सुरक्षा प्रकरणी दोन दिवसीय अधिवेशन घ्या, राज्यपालांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

महिला सुरक्षा प्रकरणी दोन दिवसीय अधिवेशन घ्या, राज्यपालांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

महिला सुरक्षा प्रकरणी दोन दिवसीय अधिवेशन घ्या, राज्यापलांच्या मुख्यमंत्री ठाकरेंना पत्राद्वारे सूचना

साकिनाका बलात्कार प्रकरण आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन घ्यावे अशा प्रकारचे सूचना राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यपालांनी अधिवेशन घेण्याची सूचना दिली आहे. राज्यात आणि मुंबईत दोन ठिकाणी मगाील काही दिवसांत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच मुंबईत दहशवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रश्नांवर विधानसभेच चर्चा करण्यात यावी अशी सूचना राज्यपालांनी दिली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी कोणत्या सूचना केल्या आहेत. ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दोन दिवसांचे आधिवेशन घेण्याची सूचना दिली आहे. राज्यापालांच्या सूचनेनंतर राज्य सरकार आणि राज्यपाल पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी सही केली नसल्यामुळे याआधीच राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. तर आता महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर दोन दिवसीय विधानसभा अधिवेशन घेण्याचा सल्ला दिल्यामुळे पुन्हा राज्यपाल आणि राज्य सरकार आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

मुंबईतील साकीनाका भागात एका महिलेवर बलात्कार करुन गुप्तांगाला इजा करण्यात आली. यानंतर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेला दोन दिवस होत नाहीतर तर कांजुरमार्गमधील उच्चभ्रू सोसायटीतील वॉचमनने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरुन विरोधकांनी हल्लाबोल केला होता. परंतु या घटनेवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली असून याबाबत अधिवेशन देण्याची मागणी राज्यपाल यांनी केली आहे.

प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

राज्यपालांच्या पत्रावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की, राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टीकडे कोणी पाहू नये, राज्यपालांनी अधिवेशनासाठी राज्य सरकारला सूचना देणं यापुर्वीच अपेक्षित होते. महाराष्ट्रात खून, बलात्कार, विनयभंग आणि महिला अत्याचार कधी नव्हे तेवढे झाले आहेत. साकिनाका बलात्कार प्रकरणात महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे दिंडवडे निघाले आहेत. अशावेळी जनतेतून आक्रोश झाल्यावर यावर काहीतरी कायमचा तोडगा काढणे गरजेचे आहे. अशी मगाणी आल्यानंतर राज्यपालांनी अधिवेशन घेतलं तर फलदायी चर्चा होईल आणि शक्ती कायदा असेल तसेच भविष्यात काय काळजी घेतली पाहिजे अशी चर्चा करुन आपण या घटनांना न्याय देऊ शकतो. मुंबईत रात्रीसुद्धा फिरणं भयमुक्त होते आता पुन्हा अशी भयमुक्त फिरणं कसं होईल याची चर्चा झाली पाहिजे असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : काँग्रेसच्या कितीही मोठ्या नेत्याने बेईमानी केल्यास लाथा घाला, सुनील केदार यांचं वक्तव्य


 

First Published on: September 21, 2021 2:14 PM
Exit mobile version