आजोबा अन् मामानेच केला खून; आव्हानात्मक गुन्ह्याचा उलगडा

आजोबा अन् मामानेच केला खून; आव्हानात्मक गुन्ह्याचा उलगडा

Police in Maharashtra s Thane district murdering a 25 year old youth Aakash Thube lives in vasant Vihar area

अकोले : भंडारदर्‍याजवळील वाकी शिवारात कृष्णावंती नदीच्या पाण्यात दोन गोण्या आढळून आल्या होत्या. या गोण्यांमधून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना बोलावण्यात आले होते. पोलिसांनी या गोण्या उघडल्या असता त्यात एका तरुणाच्या शरिराचे अवयक तुकडे केलेल्या अवस्थेत आढळळे होते. राजुर पोलिस ठाण्यात यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनास्थळी पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपअधीक्षक रोशन पंडीत यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिली होती. मृताची व खुन्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली नगरचे पोलिस पथक, उपअधीक्षक पंडीत यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर पोलिसांचे एक पथक, राजुरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक आरोपींचा शोध घेत होते.

प्रदीप सुरेश भांगरे (वय २५) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव असून तो खिरविरे येथील रहीवासी आहे. कमलाकर हनुमंत डगळे (वय ७०) आणि हरि कमलाकर डगळे (दोघे रा. खिरविरे) अशी आरोपी बापलेकाची नावे आहेत. यातील एक मृताचा आजोबा तर दुसरा मामा आहे. आजोबा आणि नातवात दारुच्या पैशावरुन काही दिवसांपुर्वी वाद झाले, त्यातुन त्याने आजोबाच्या मानेवर पाय दिला होता. दोन-तीन दिवसांपुर्वी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादातूनच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आजोबाने नातवाची हत्या केली. त्याच्या शरिराचे तुकडे करत ते मुलाच्या मदतीने नदीत फेकले असल्याचे समोर आले.

First Published on: July 4, 2020 5:18 PM
Exit mobile version