कारगिल दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

कारगिल दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

कारगिल विजय दिनानिमित्त शुक्रवारी रायगड जिल्हा प्रशासनातर्फे कारगिल युद्धात शहीद झालेले तालुक्यातील सहाणगोठी येथील नीलेश तुणतुणे यांना अभिवादन करण्यात आले. गावाच्या वेशीवर असलेल्या शहीद तुणतुणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, तुणतुणे यांचे कुटुंबीय, ग्रामस्थ उपस्थित होते.

अलिबाग येथील महेश चित्रमंदिर येथे ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान, नागोठणे व खालापूर येथे उरी चित्रपट विद्यार्थ्यांना मोफत दाखविण्यात येऊन शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शासकीय अधिकारी उपस्थित होते.

First Published on: July 27, 2019 4:30 AM
Exit mobile version