Live Update : आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना स्पष्टच सांगितलं

Live Update : आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना स्पष्टच सांगितलं

Live update Mumbai Maharashtra

आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही, सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा लढणार; कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा


मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत


महानगरपालिकेच्या बाजार विभागाचे सहाय्यक आयुक्त असलेले दुय्यम अभियंता भूषण लक्ष्मण भुसाणे यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली.


हेरॉईन तस्करीप्रकरणी दोन आरोपींना मालवणीतून कांदिवली युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अब्दुल सलाम माझीम शेख आणि अब्दुल रजाक गुळशेर शेख अशी या दोघांची नावे आहे


कर्नाटकातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी सेवा बंद


कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली महत्वाची बैठक, संदीपान भुमरे, संजय राठोड बैठकीसाठी दाखल


कर्नाटक सरकारविरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाचा मोर्चा;कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं


सीमावादाच्या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे – शरद पवार

बेळगावात जे घडले त्याचा निषेध – शरद पवार


पुण्यात कर्नाटकच्या गाड्यांना काळे फासत तोडफोड


महाविकास आघाडीच्या 17 तारखेच्या मोर्चाला MIMचा पाठींबा – जलील


महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देणार – मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

कर्नाटक मुख्यमत्री बोम्मईंचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आश्वासन


बेळगाव-हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या 6 गाड्यांवर कन्नड रक्षण वेदिकेचा हल्ला

दगडफेक, शाईफेक करत महाराष्ट्राच्या गाड्यांना रोकले

महाराष्ट्रविरोधात कन्नड रक्षण वेदिका आक्रमक


नटवर्य मोहनदास सुखटणकर यांचे निधन


सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी १३ जानेवारीला होणार


जागतिक बॅंकेच्या अंदाजानुसार भारताचा वास्तविक जीडीपी 6.9 टक्क्यांपर्यंत घसरले

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या दाखल


ईस्टर्न एक्स्प्रेस वे मार्गावर कुर्मगतीने वाहतूक, विक्रोळी ते ठाणे वाहनांच्या रांगा


डॉ. आंबेडकरांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी वाहिली श्रद्धांजली


गोकुळचे दूध पुन्हा महागले, गायीच्या दुधात 3 रुपयांची वाढ


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी दाखल

उद्धव ठाकरे यांच्यासह युवानेते आदित्य ठाकरे, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर दाखल झाले आहेत


ब्रह्मपुरी दिवाणी न्यायालयाजवळ आढळला महिलेचा मृतदेह


प्रकाश आंबेडकर महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल

महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमीवर दाखल

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री, खासदार आणि आमदार दाखल


संसद अधिवेशनाच्याआधी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अजित पवार चैत्यभूमीवर दाखल

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी नेते जयंत पाटील दाखल

First Published on: December 6, 2022 4:41 PM
Exit mobile version