ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेवर..,गुलाबराव पाटलांची राज ठाकरेंवर टीका

ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेवर..,गुलाबराव पाटलांची राज ठाकरेंवर टीका

नाहीतर तोच कांदा तुमच्या तोंडावर हाणून मारु, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे मनसेच्या अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. परंतु पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असल्याचं पोस्टर लागलं असून त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यावरून सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची यावरुन राज ठाकरेंवर टीका केली आहे.

या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, हिंदू जननायक कुणाला म्हटलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होतो काय?, असा सवाल गुलाबराव पाटलांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांचा जन्म शिवसेनेत झाला. शिवसेना राहिली नसती तर हे कुठे राहिले असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ते युवासेनेचे अध्यक्ष झाले होते. पण ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेवर बोलायचा तुम्हाला अधिकार नाही, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. हनुमान जयंतीनिमित्त पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. तसंच, सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे.


हेही वाचा : पुण्यात राज ठाकरे अन् वसंत मोरेंनीच गैरहजेरीवर केला खुलासा


 

First Published on: April 15, 2022 3:33 PM
Exit mobile version