वकील गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी, सातारा जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय

वकील गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी, सातारा जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय

संग्रहित छायाचित्र

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत. न्यायालयाचा हा निकाल गुणरत्न सदावर्तेंसाठी मोठा धक्का आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

आज न्यायालयासमोर वकील गुणरत्न सदावर्तेंना हजर करण्यात आलं. सरकारी पक्षाने त्यामध्ये जोरदार युक्तिवाद केला. सरकार पक्षाला मदत करण्यासाठी आम्ही राजेंद्र निकम यांच्यातर्फे हजर होतो. आम्ही वकिलपत्र दिलं. मेहरबान न्यायालयासमोर आम्ही बाजू मांडली. जी घटना घडलेली आहे. ही अतिशय निंदनीय असून त्याचा पंचनामा होणं हे अत्यंत गरजेचं आहे, असं मी कोर्टाला सांगितलं आहे. न्यायालयाने आमची बाजू ऐकून घेतली. त्यानुसार मेहरबान न्यायालयाने सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, असं सरकारी वकील म्हणाले.

कोणते मुद्दे मांडले?

या आरोपीचं वागणं कशाप्रकारचं आहे. याबाबत आम्ही मुद्दा मांडला. मात्र, मी अशाप्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये, असं सदावर्ते म्हणाले. परंतु त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे. ते न्यायालयासमोर आम्ही पूर्णपणे मांडलं. यामध्ये व्हॉईस सॅम्पल घेणे गरजेचं आहे आणि घटनास्थळी पंचनामा होणं देखील महत्त्वाचं आहे. आरोपीला हे वक्तव्य करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याचा तपास होणं महत्त्वाचं असल्याचं न्यायालयासमोर सांगितलं आहे, असं सरकारी वकील म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना निर्माण झाल्या होत्या. दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टात आज हजर करण्यात आले होते. मात्र, सदावर्तेंच्या अडचणीत वाढ झाली असून ४ दिवसांसाठी पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.


हेही वाचा : Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?


 

First Published on: April 15, 2022 1:16 PM
Exit mobile version