Silver Oak riot : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंना जामीन मंजूर; 115 एसटी कर्मचाऱ्यांनाही दिलासा

Silver Oak riot : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंना जामीन मंजूर; 115 एसटी कर्मचाऱ्यांनाही दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हल्ला प्रकरणातून वकील गुणरत्न सदावर्तेंना जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्यासह हल्ल्यात सहभागी 115 एसटी कर्मचाऱ्यांनाही मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सदावर्तेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, शरद पवार यांच्या घरावरील हल्ला ही गंभीर घटना होती. यानंतर घटनेत कट रचल्याप्रकरणी सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून सदावर्तेंसह 115 आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सदावर्तेंना काहीसा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सदावर्तेंना 50 हजारांच्या जातमुचक्यावर आणि तितक्याच रकमेच्या हमी रकेमवर जामीन मंजूर केला आहे. तर इतर 115 आंदोलकांना प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेले पैसे देण्यास तयार असल्याचे गुणरत्न सदावर्तेंच्या वकीलांनी सांगितले आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्लासाठी कट रचल्याच्या आरोपाखाली वकील गुणरत्न सदावर्ते करण्यात आली होती. या हल्लासाठी सदावर्तेंच्या घरी मागील 6 महिन्यांपासून मॅरेथॉन बैठका होत होत्या तसेच या बैठकीला एसटी कर्मचारी गट करुन येत होते अशी माहिती देखील समोर आली होती. या प्रकरणी आता मुंबई सत्र न्यायालयाकडून सदावर्तेंसह 115 आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.   50 हजारांच्या जातमुचक्यावर आणि तितक्याच रकमेच्या हमी रकेमवर न्यायालयाने सदावर्तेंना जामीन मंजूर केला आहे. तर इतर 115 आंदोलकांना प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी दगड आणि चप्पल फेक केली होती. या आंदोलनाचे मुख्य सूत्राधार गुणरत्न सदावर्ते होते असा आरोप करण्यात आला होता. मात्र आपण फक्त कर्मचाऱ्यांना विना पैसे मदत केली असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले.  शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. तसेच या आरोपामध्ये सदावर्तेंना अटक करण्यात आले आहे.


 

First Published on: April 22, 2022 6:22 PM
Exit mobile version