‘ज्ञानदीप’ अत्याचारप्रकरण : पीडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता

‘ज्ञानदीप’ अत्याचारप्रकरण : पीडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता

पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रम पाच अल्पवयीन तर एक १७ वर्षी मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवसेंदिवस या गुन्ह्याची व्याप्ती वाढत आहे. माणुसकीला काळींबा फासणार्‍या संशयित हर्षल उर्फ सोनू मोरेने २०१८ ते २०२२ या काळात आणखी मुलींचे लैंगिक शोषण केले आहे का?, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यावर पोलीस यंत्रणा काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

म्हसरूळ शिवारातील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात १४ वर्षांच्या मुलीवर संशयित संस्थाचालक हर्षल मोरे याने अश्लिल व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आश्रमातील मुलींनी जाबजबाबात संशयिताने लैंगिक शोषण केल्याचे सांगितले. २०१८ ते २०१९ या कालावधीत संशयित आरोपीने चार अल्पवयीन मुली व सज्ञान मुलीचे लैंगिक शोषण केले. या घटनेनंतर आश्रमातील आणखी किती पीडित मुली आणि पालक तक्रार देण्यासाठी समोर येतात, हे येत्या काही दिवसात समोर येणार आहे.

तक्रारदार पीडित अल्पवयीन मुलीने संशयित आरोपी अत्याचार करत असल्याचे चुलत बहिणीला सांगितली. पीडितेच्या बहिणींनी हा प्रकार आदिवासी उलगुलान सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर फसाळे यांना सांगितला. त्यानंतर गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला. पोलीस तपासात अत्याचार पीडितेच्या संख्येत वाढ झाली आणि सहा वर पोहचला. परंतु, २०१८ ते २०१९ या कालावधीत अनेक मुली संशयित हर्षल मोरेच्या त्रासाला व जाचाला कंटाळून आश्रमातून निघून गेल्या असाव्यात, असा अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणी आदिवासी संघटनेने केली आहे.

First Published on: November 30, 2022 1:24 PM
Exit mobile version