अलर्ट! कोरोनासारखा नवा विषाणू येतोय! मास्क वापरण्याचं सर्वच राज्यांना आवाहन

अलर्ट! कोरोनासारखा नवा विषाणू येतोय! मास्क वापरण्याचं सर्वच राज्यांना आवाहन

कोरोना महामारीनंतर आता H3N2 व्हायरसनेही दहशत वाढवली आहे. व्हायरल तापाने देशाला जणू ग्रासले आहे. H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे देशात दोन मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जानेवारी महिन्यापासून देशात एडेनोव्हायरसचे रुग्णही नोंदवले जात आहेत. दरम्यान अनेक राज्यांमध्ये कोविड-19 संसर्गामध्येही वाढ दिसून आली आहे, अशा परिस्थितीत आता केंद्राने सर्वच राज्यांना अलर्ट दिला आहे. आज नीती आयोगानेही यावर बैठक घेण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांच्या वतीने सर्व राज्यांना एक पत्र लिहिलं आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय.

देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना सतर्क राहण्याच्या आणि वाढत्या संसर्गावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासनही देण्यात आले आहे. शात या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आज महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, रुग्णांचं बारकाईने निरीक्षण करावं, असं सांगितलं आहे. तसेच कमी प्रतिकारक क्षमता असलेल्या लोकांनी काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. ज्या जिल्ह्यात रूग्ण आढळले आहेत त्या जिल्ह्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला सूचना करावी, असेही सांगण्यात आले आहे.

First Published on: March 11, 2023 4:08 PM
Exit mobile version