मराठवाड्यात अवकाळी पाऊस; वादळी वाऱ्यासह गारपीट

मराठवाड्यात अवकाळी पाऊस; वादळी वाऱ्यासह गारपीट

मराठवाड्याच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बीड, लातूर जिल्ह्यामध्ये वादळई वाऱ्यासह गारांचा पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर दुष्काळानंतर अवकाळी पावसाचे संकट आले आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात आणि लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत आला आहे.

लातूर जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये आज जोरदार गारांचा पाऊस झाला. जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने जोर धरला होता. वर्षानुवर्ष दुष्काळ सहन कराव्या लागणाऱ्या परिसरामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाचा फटका पुन्हा एकदा या ठिकाणच्या परिसराला बसला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा, शिरूर आनंतपाळ, देवनी, उदगीर या भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. त्यासोबतच काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. आज सकाळपासूनव जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा होता मात्र अचानकच आज वातावरणात बदल झाला आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. लातूरमधील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बीडमध्ये अचानक आज दुपारपासून अवकाळी पावसाला सुरुवात आली. बीड जिल्ह्यामध्ये वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. धारुर तालुक्यातील धुनकवड येथे विज कोसळुन एक जण ठार तर केज तालुक्यातील तांबवा येथे ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अंबाजोगई शहरांसह आसपासच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. तर इतर भागामध्ये विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली आहे. अचानक पाऊस सुरु झाल्याने लाकोंचा तारंबळ उडाली. या पावसामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. शेतकऱ्यांचा आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर फळबागा आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

First Published on: April 4, 2019 7:00 PM
Exit mobile version