नवाब मलिकांना आरोपांवर हाजी अराफत आज बोलणार, पत्रकार परिषदेतून करणार पलटवार

नवाब मलिकांना आरोपांवर हाजी अराफत आज बोलणार, पत्रकार परिषदेतून करणार पलटवार

नवाब मलिकांना आरोपांवर हाजी अराफत आज बोलणार, पत्रकार परिषदेतून करणार पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात खळबळजनक गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती भाजप नेते हाजी अराफत यांनी दिली आहे. नवाब मलिकांना आता तोंड दाखवण्यासाठी लाज वाटेल अशी प्रतिक्रिया हाजी अराफत यांनी दिली आहे. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर पत्रकार परिषद घेऊन पलटवार कऱणार असल्याचे हाजी अराफत यांनी सांगितले आहे. बोगस नोटांच्या प्रकरणी हाजी अराफत यांच्या भावाला अटक करण्यात आली होती यानंतर हाजी अराफत यांना अल्पसंख्यांक मंडळाचे अध्यक्ष केलं असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान बुधवारी मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बनावट नोटांच्या प्रकरणी आरोप केले आहेत. यामध्ये हाजी अराफत यांचेही नाव घेण्यात आलं आहे. हाजी अराफत यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना नवाब मलिकांनी सिनेमा सुरु केला आहे आता त्याला मी संपवणार असल्याचा इशारा दिला आहे.

भाजप नेते हाजी अराफत यांनी म्हटलं आहे की, कोणाचे संबंध अंडरवर्ल्डशी आहे? या सगळ्या गोष्टी पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याचा इशारा हाजी अराफत यांनी दिला आहे. तसेच नवाब मलिकांना सांगू इच्छितो की, त्यांना तोंड दाखवण्याची जागा राहणार नाही. आता नवाब मलिकांना मीडियाची सवय झाली आहे. त्यांना सकाळी आणि संध्याकाळी मीडिया पाहिजे परंतु काही दिवसानंतर मीडियापासून पळतील असे हाजी अराफत म्हणाले.

मलिकांनी काय आरोप केले?

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी आरोप केला होता की, फडणवीस सरकारच्या काळात १४ कोटी ५६ लाख रुपयांचे बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आले होते. हे बोगस नोटांच्या प्रकरणात ज्या लोकांना सोडण्यात आले त्यांना जामीन कसा मिळाला यामध्ये हाजी अराफत यांचा भाऊ सामील होता. जो पकडला त्याच्या भावाला अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवला. हा योगायोग आहे? या केसचे इन्चार्ज हे समीर दाऊद वानखेडे होते असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.


हेही वाचा :  फडणवीस सरकारमधील भाजपच्या मंत्र्याने मंदिराची जमीन हडपली; मलिकांचा गंभीर आरोप

First Published on: November 12, 2021 12:13 PM
Exit mobile version