करोनाची लागण झाली, तर मला फाशी द्या

करोनाची लागण झाली, तर मला फाशी द्या

लाहोरमध्ये सुन्नी कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे

पाकिस्तान सरकारने मोठ्या संख्येने जमावबंदी करू नये असे आदेश दिले आहेत. पाकिस्तानतही एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात करोनाच्या पॉझिटीव्ह केसेस वाढल्या आहेत. करोनाचे सावट हे येत्या दिवसांमधील लाहोर येथे आयोजित ऑल पाकिस्तान सुन्नी कॉन्फरन्सवर असतानाच ही कॉन्फरन्स होणारच असल्याचा दावा कॉन्फरन्सच्या आयोजकांनी केला आहे. तेहरीक लब्बाईक या रहूल या संघटनेचे अध्यक्ष अल्लाह मुहम्मद अश्रफ आसिफने जलाली यांनी कोणत्याही परिस्थितीत ऑल पाकिस्तानी सुन्नी कॉन्फरन्स होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या २१ मार्चला होणाऱ्या कॉन्फरन्सबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

मी आयोजक म्हणून सगळ्यांना आश्वासन देतो की, जर कोणाला करोनाची लागण झाली तर पाकिस्तान सरकारने मला फाशी द्यावी असे आव्हानच त्यांनी यानिमित्ताने दिले आहे. पाकिस्तानात आतापर्यंत एकुण ५० नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. पाकिस्तानातला करोना पॉझिटीव्हचा आकडा हा १८० च्या घरात पोहचला आहे. पाकिस्तानात येत्या एप्रिल महिन्यापर्यंत सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

First Published on: March 17, 2020 2:44 PM
Exit mobile version