मुंबई,ठाणे, पुण्यात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार!

मुंबई,ठाणे, पुण्यात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार!

प्रातिनिधिक छायाचित्र

देशातील लॉकडाऊन हळूहळू कमी करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले असताना दुसरीकडे मात्र मुंबईसह ठाणे जिल्हा व पुणे जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव सुरूच असल्याने या क्षेत्रातील लॉकडाऊन ३ मे नंतरही सुरूच ठेवण्याची सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने केली आहे. परिणामी राज्यातील लॉकडाऊनबाबत जरी ३ मे नंतर ग्रामीण भागाला दिलासा मिळू शकणार असला तरी मुंबई, पुणे, व ठाणे जिल्ह्याला मात्र लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. 31 मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता आहे.

केंद्रीय आरोग्य पथकाने मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्याची पाहणी केल्यानंतर येथील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची सूचना राज्य व केंद्र सरकारला केली आहे. त्यामुळे हा भाग वगळता राज्यातील अन्य भागातील लॉकडाऊन उठवण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेऊ शकते. मात्र, जो विभाग रेड झोनमध्ये दाखवण्यात आला आहे तसेच कंटेन्मेंट झोन ज्या भागात आहे तेथील लॉकडाऊन ३ मे नंतरही उठण्याची शक्यता नाही, असे आता स्पष्ट झाले आहे. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशात येणारा संपूर्ण ठाणे जिल्हा तसेच पालघर व रायगड जिल्ह्यातील एमएमआरडीएच्या क्षेत्रात येणार्‍या भागालाही वाढीव लॉकडाऊन लागू असेल. साधारणपणे मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश या कार्यक्षेत्रात येणार्‍या सर्वच भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने तेथे लॉकडाऊन वाढवण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

First Published on: April 26, 2020 7:05 AM
Exit mobile version